रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या एकसष्टाव्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ ऑगस्ट) करोनाबाधित एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातीलरुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे. काल (१ ऑगस्ट) रात्री उशिरा सापडलेल्या ५५ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांनंतर आज दिवसभरात आतापर्यंत नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८१ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८८ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत काल रात्री सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी २०, कळंबणी १७, कामथे १०, दापोली ३, रायपाटण १, देवरूख ४.

आज ४७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय ११, समाजकल्याण भवन ११, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली १, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे १२, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल १२ या रुग्णांचा समावेश आहे.

कापडगाव (ता. रत्नागिरी) येथील ७८ वर्षीय महिला करोनाबाधित रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६१ झाली आहे. मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी १५, खेड ६, गुहागर २, दापोली १२, चिपळूण १२, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ४, मंडणगड १. आजचे एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ५२२ आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या ३८८ असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २८४ रुग्णांनी करोनावर मात केली असून, सध्या १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply