शुक्रवारपासून तीन दिवसांचा श्री कर्णेश्वर संगीत महोत्सव

संगमेश्वर : मंदिराच्या परिसरात संगीत सेवा सादर करण्याची प्राचीन परंपरा पुन्हा एकदा जोपासण्याचे हेतूने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात येत्या शुक्रवारपासून (दि. १६ डिसेंबर) तीन दिवस श्री कर्णेश्वर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मुंबईत अदृश्य रंगकर्मी नमनाचे एकाच दिवशी तीन प्रयोग

मुंबई : येत्या १८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात अदृश्य रंगकर्मी नमन पाहण्याची संधी मिळणार आहे. एकाच दिवशी तीन प्रयोग होणार आहेत.

निसर्गरम्य तोणदे गाव (व्हिडिओ)

तोणदे (ता. जि. रत्नागिरी) हे कोकणातील एक निसर्गरम्य गाव. या गावातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ प्रहर विठ्ठला महाकाळ या रत्नागिरीतील तरुण कलाकाराने केला आहे.

कर्णेश्वर मंदिरात १६ डिसेंबरपासून कला-संगीत महोत्सव

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील चालुक्यकालीन अकराव्या शतकातील शिल्पसमृद्ध कर्णेश्वर मंदिरात येत्या १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

साखरप्याच्या दत्तमंदिरात मकरंदबुवा सुमंत यांचे गुरुचरित्र कथामृत

गुरुचरित्र कथामृताचा कार्यक्रम तो २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात दररोज सायंकाळी ४ वाजता होईल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यज्ञ, वैदिक पूजन, गोपूजन, अन्नदान आदी अनेक कार्यक्रम दररोज होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

कोकणातील वैभवशाली रंगभूमी – दशावतारी नाट्य

पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा, सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख!