
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील चालुक्यकालीन अकराव्या शतकातील शिल्पसमृद्ध कर्णेश्वर मंदिरात येत्या १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
प्राच्यविद्या अभ्यासकांसाठी, पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठीही कर्णेश्वर मंदिर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. याच कर्णेश्वर मंदिराच्या आवारात श्री कर्णेश्वर देवस्थान आणि कलांगण-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कला – संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात नृत्य, वादन आणि गायन कलांचा आविष्कार अनुभवता येणार आहे. संपूर्ण कर्णेश्वर मंदिर एलईडी दिव्यांच्या उजेडात उजळून निघणार असून त्यासमोर स्वर्गीय कला सादर केल्या जाणार आहेत. कला रसिकांसाठी ही पर्वणीच असेल.
महोत्सवामध्ये मुंबईच्या प्रख्यात व्हायोलिन वादक श्रृती भावे यांचा व्हायोलिन वादनाचा श्रृती नाद कार्यक्रम, चिपळूणमधील नृत्य मल्हार कथ्थक अकादमीचा कला दर्पण हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची गायन मैफल असे दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहेत.
अधिक माहितीसाठी निबंध कानिटकर (९४२२३७६३२७), अवधूत जोशी (९४०३०३१५५८), तेजस संसारे (९८६०४०३९२०) किंवा किरण पाध्ये (९४२०५२५६५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

