जांभवडे (ता. कुडाळ) : येथील पु. वि. काजरेकर यांच्या घरातील वंशपरंपरागत कोजागिरी उत्सव काल रात्री कणकवलीचे गायक मनोज मेस्त्री यांच्या गायनाने अत्यंत उत्साहात साजरा झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जांभवडे (ता. कुडाळ) : येथील पु. वि. काजरेकर यांच्या घरातील वंशपरंपरागत कोजागिरी उत्सव काल रात्री कणकवलीचे गायक मनोज मेस्त्री यांच्या गायनाने अत्यंत उत्साहात साजरा झाला.
जांभवडे (ता. कुडाळ) : येथील काजरेकर यांच्या घराण्यात कोजागरीच्या उत्सवाला आर्यादुर्गा आणि लक्ष्मींद्राला विविध प्रकारच्या पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या उत्सवानिमित्ताने आज कणकवलीतील गायक मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
यमनरंगसंगमेश्वर : कलांगण संगमेश्वर संस्थेतर्फे यमनरंग मैफलीचे आयोजन येत्या १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
अत्यंत शांत व प्रसन्न वातावरण असलेली वेगवेगळ्या देवतांची विशाल मंदिरे हे कोकणाचे एक वैशिष्ट्य. कोकणाला देवभूमी म्हटले जाण्याचे कदाचित हेही एक कारण असावे. यापैकी अनेक मंदिरे जुन्या काळच्या अतिशय सुंदर अशा काष्ठशिल्प परंपरेचा समृद्ध वारसा आहेत. मंदिरांचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे ‘फॅड’ सध्या आले आहे; मात्र जुनी मंदिरे पाडून सिमेंटची मंदिरे उभी करणे म्हणजे हा अनमोल वारसा स्वतःहून उद्ध्वस्त करण्यासारखेच आहे. या पार्श्वभूमीवर, या विषयाचे अभ्यासक डॉ. नितीन हडप यांनी लिहिलेला, माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री यक्षिणी मंदिर आणि कोकणातील अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांतील काष्ठशिल्पांची थोडी ओळख करून देणारा हा लेख
कोकणात, खासकरून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात नवरात्रौत्सवात नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. शहाजीराजांनी सुरू केलेली ही परंपरा सरवदे समाजाने गेली ४०० वर्षं निष्ठेनं जपली आहे. इथून पुढच्या काळात मात्र ती लुप्ततेच्या मार्गावर आहे. या परंपरेविषयी…
भाद्रपदात गणेश चतुर्थीला पूजन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. या अनंत चतुर्दशीविषयीची माहिती.