साखरप्याच्या दत्तमंदिरात मकरंदबुवा सुमंत यांचे गुरुचरित्र कथामृत

रत्नागिरी : कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर) येथील श्री दत्त देवस्थानात यावर्षी एकशेपाचवा दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार – प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांच्या गुरुचरित्र कथामृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुचरित्र कथामृताचा कार्यक्रम तो २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात दररोज सायंकाळी ४ वाजता होईल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यज्ञ, वैदिक पूजन, गोपूजन, अन्नदान आदी अनेक कार्यक्रम दररोज होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी दानशूर दत्तभक्तांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. ही मदत थेट बँक खात्यात करण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा तपशील असा –

श्री दत्त देवस्थान कोंडगाव,

जनता सहकारी बँक लि.-पुणे, शाखा साखरपा,

खाते क्र.: 024220100003665, IFSC: JSBP 0000024.

UPI: shridattadev@jsb.

देणगी बँक खात्यात पाठवल्यावर चैतन्य सरदेशपांडे (९१३०३७६७१०) यांना तपशील कळवावा, असे सूचित करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply