सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच बदलही स्वीकारार्ह – सौ. अंजली बर्वे

चिपळूण : मानवी जीवनात संस्कारांना महत्त्व आहे. आजवर चालत आलेल्या सुसंस्कारांचा मागोवा घेतानाच काळानुरूप झालेले बदलही स्वीकारले पाहिजेत, असे मत कीर्तनकार अंजली बर्वे यांनी व्यक्त केले.

संतसाहित्यातील शिकवणीची दैनंदिन जीवनाशी सांगड आवश्यक : धनंजय चितळे

चिपळूण : ओव्या आणि इतर संतसाहित्यामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठी शिकवण दिली आहे. तिची दैनंदिन जीवनाशी सांगड घातली गेली पाहिजे, असे मत चिपळूण येथील प्रवचनकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी व्यक्त केले.

टिळक स्मारक वाचन मंदिर आणि मसापतर्फे ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपरान्तायन’ दृक्श्राव्य मालिका येत्या ७ ते १८ मार्च या कालावधीत प्रसारित होणार आहे. बोली, लोककला आणि साहित्यातून फागपंचमी ते धूलीवंदन या काळातमराठी माती आणि माणसांशी अनोखा संवाद साधणारी ही मालिका आहे.

चिपळूणच्या वाचनालयात अप्पासाहेब जाधव यांचा पुतळा

चिपळूण : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात स्वर्गीय अरविंद तथा आप्पासाहेब जाधव यांच्या पुतळ्याचे अनावरण चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.

डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल – जोशी

चिपळूण : समाजाशी एकरूप झालेले साहित्यिक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेला डॉ. तानाजीराव चोरगे महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे साहित्यिकांची समाजाभिमुखता वाढेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन झाले.