रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराची बाधा झालेले सोळा रुग्ण आढळले असून सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी पुनर्वसन कामाला वेग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या जुलैच्या अखेरच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्वच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आतापर्यंत एकूण १ कोटी ७८ लाख ३६ हजार ८०० रुपयांच्या मदतवाटपाचे काम प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

रत्नागिरी : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसे आदेश मंगळवारी, १३ जुलै रोजी सायंकाळी मुंबईत मंत्रालयातून देण्यात आले आहेत.