स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणे सोपे : सत्यवान रेडकर

पालघर : स्पर्धा परीक्षांविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.

‘कोमसाप’ची मालवण शाखा ठरली उत्कृष्ट; वामनराव दाते पुरस्कार प्रदान

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेला अलीकडेच पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कै. वामनराव दाते उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

उंचसखल गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली यंत्रणा

पालघर (नीता चौरे) : उंचसखल असलेल्या संपूर्ण गावाला सारख्याच दाबाने पाणीपुरवठा करण्याची देशातील पहिली यंत्रणा पालघर जिल्ह्यात साकारली आहे. कमी खर्चात उभारण्यात आलेली ही यंत्रणा उंचसखल भागात वसलेल्या कोकणातील अनेक गावांना उपयुक्त ठरणार आहे.

पालघरच्या किनारपट्टीवर कलहंसाचा मुक्त विहार

पालघर (नीता चौरे) : वातावरणातील वेगाने होणारे बदल आणि कमीजास्त प्रमाणात पडणारी थंडी अशी स्थिती असूनही पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक परदेशी पक्षी वास्तव्याला आले आहेत. त्यापैकी कलहंस नावाच्या पक्ष्याचा विहार पाहायला अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटक पालघरच्या किनारपट्टीवर येऊ लागले आहेत.

भात, नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

पालघर : मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार-मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भातशेती आणि नाचणी शेतीला बगल देत किंवा भात आणि नाचणीच्या कापणीनंतर तेथील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळत आहे.