स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणे सोपे : सत्यवान रेडकर

पालघर : सरकारी नोकरी मिळवून अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. त्याविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.

गासकोपरी (विरार) येथे गराजलो रे गराजलो नाटकाच्या माध्यमातून श्री सोमेश्‍वर कलामंच ही सामाजिक संस्था उभी राहिली आहे. त्या संस्थेतर्फे दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कररिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. रेडकर बोलत होते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन यश कसे संपादन करायचे, याबाबत त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरळ आणि सोप्या पद्धतीने एकाच दिवसात पन्नास टक्के इंग्लिश बोलता येते, याचे प्रात्यक्षिक महादेव कोकाटे यांनी एका मुलाकडून करून घेतले. वयाच्या ८५ व्या वर्षीसुद्धा अतिशय भारदस्त आवाजात त्यांनी मुलांना ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले. श्री. रेडकर आणि श्री. कोकाटे यांनी वातावरण हसत खेळत वातावरण ठेवून कार्यक्रमात रंगत आणली.

गराजलो रे गराजलो नाटकाच्या माध्यमातून पंधरा मुद्दे घेऊन कोकणात चळवळ उभी करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहदेव धर्णे यांनी यावेळी केले.

समारंभात रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शंकर नाईक, बाळ वेळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. धर्णे यांनी प्रशस्तिपत्रक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

यावेळी सावंतवाडीचे मिहिर मठकर उपस्थित होते. त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. लहू पारकर, कु. बाबु मांडवकर, नारायण दळवी, बबन भोवळ, महेश, तसेच अन्य सर्वांनी समारंभ यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. वसई सावंतवाडी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply