पाश्चात्य विद्वानांना गीता अर्थासह पाठ; आपल्याकडे मात्र उपेक्षा : धनंजय चितळे

‘झोंपाळ्यावरची गीता’ या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे गीता जयंतीच्या औचित्याने तीन डिसेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत प्रकाशन झाले. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, व्याख्याते-प्रवचनकार धनंजय चितळे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.

‘१९४२ चिपळूण’मधून चिपळूणच्या इतिहासाची माहिती – आमदार शेखर निकम

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात झाले.

ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’चे प्रकाशन

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ‘१९४२ चिपळूण’ या ग्रंथाचे येत्या ऑगस्ट क्रांतिदिनी (दि. ९ ऑगस्ट) प्रकाशन होणार आहे.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

हिंदूंची ताकद एकीमध्येच – उदय गोविलकर

रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.