‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

‘कोमसाप’च्या १८व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या मध्यवर्ती
साहित्य संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण आज जिल्हा माहिती अधिकारी
प्रशांत सातपुते यांच्या हस्ते झाले.

मालगुंडमधील सुप्रिया कुंटे यांचे देहदान

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडमधील नवींद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे १० सप्टेंबरला निधन झाले. त्या ऐंशी वर्षांच्या होत्या. त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी घेतला.

प्रत्येक गाव व्हावे पुस्तकांचे गाव

संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

सावरकर विद्यापीठाची गरज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती यावेळी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. राज्य शासनाने प्रथमच त्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडे सामाजिक समरसता आणि हिंदुत्व याबाबत अत्यंत टोकाची मते तयार झाली आहेत. ही टोके विचारांनीच बोथट करता येऊ शकतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी सावरकरांचा उल्लेख शतपैलू सावरकर असा केला होता. त्यांच्या या सर्व पैलूंचे संशोधन आणि अभ्यास तसेच प्रामुख्याने त्यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सावरकर विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.

भीक मागून एसटीची स्वच्छता

सर्वसामान्य प्रवासी पुन्हा एकदा एसटीकडे वळावेत, या उद्देशाने दोन कोटी रुपयांची बक्षीस योजना एसटीने जाहीर केली आहे. पण ती करतानाही शासनाकडून किंवा तोट्यातील एसटी महामंडळाकडून कोणतीच आर्थिक तरतूद केली जाणार नाही. देणगीदार, उद्योजक, सामाजिक संस्थांकडून पैसे उपलब्ध करून घेऊन एसटी बस, उपाहारगृहे, बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुंदर केला जावा, अशी ही योजना आहे. त्यातून निवड होणाऱ्या बसस्थानकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. थोडक्यात म्हणजे कर्मचाऱ्यांनी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करून हे सौंदर्यीकरण करायचे आहे.

साहित्य चळवळीला चालना

कोकणात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. अनेक साहित्यिक कोकणाने घडवले आहेत. विविध साहित्यिक संस्था, संघटना कोकणात पूर्वीपासून काम करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेपाठोपाठ मराठी साहित्य परिषदेच्याही अनेक शाखा कोकणात ठिकठिकाणी स्थापन झाल्या आहेत. त्यात आता अखिल भारतीय साहित्य परिषद या देशपातळीवरील साहित्य संस्थेची भर पडणार आहे. कोकणातील साहित्य चळवळीला देशपातळीवर स्थान देऊ शकणाऱ्या या संस्थेचे स्वागत करायला हवे.