एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१२ डिसेंबर २०२२) किनारा हे नाटक रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ सादर करणार आहे. हे प्राथमिक फेरीतील अखेरचे नाटक आहे. सागरामध्ये भरकटलेले जहाज कधी ना कधी किनाऱ्याला येतेच. मानवी जीवनात स्त्री हाच कुटुंबाचा किनारा असते. हे दाखविणारे हे नाटक जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले आहे.