
एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (१२ डिसेंबर २०२२) : किनारा
सादरकर्ते : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ, रत्नागिरी
सागरामध्ये भरकटलेले जहाज कधी ना कधी किनाऱ्याला येतेच. कारण किनारा हाच त्यांचा शाश्वत आधार असतो. सामान्य परिस्थितीतील शिरूभाऊ, आता मात्र सोपं फॅक्टरीचा मॅनेजर आहे. वय ५०, पण अजूनही आकर्षक, उत्तम प्रकृती. पत्नी जिजी वय ५४-५५, मुलगी शामा वय २३-२४, मुलगा यदुनाथ वय २०-२१. पोस्टात काम करणारे सरळमार्गी शेजारी फडके, वय ५७-५८.
आणि शिरूभाऊंच्या प्रेमात (?) असलेली रोझी फर्नांडिस काय किंवा अलीकडची शैला काळे काय! बायको आणि बायकांतला फरक न समजणारे शिरूभाऊ, स्वैरपणे उधळततात, त्याची पोझिशन आणि पैशामुळे त्यांच्या भोवती जमणाऱ्या अन्य स्त्रिया, यामुळे बाहेरख्याली शिरूभाऊ, त्यातच दारू पार्ट्या, क्लब यामुळे समाजात त्यांची नाचक्की होते. अर्थातच या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत, पत्नी जिजीची होणारी घुसमट. पण हेच शिरूभाऊ आजारी पडतात आणि आधारासाठी पुन्हा घरी परततात, तेव्हा कुटुंब टिकविण्यासाठी धडपड करणारी जिजी त्यांना मोठ्या मनाने स्वीकारते. कारण पत्नी ही क्षणकालाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. माता नेहमीच क्षमाशील असते. शिरूभाऊ नावाचे भरकटलेले जहाज, जिजी नावाच्या बंदरात विसावते.
कुटुंब या अर्थाने दळवींनी नाटकाला दिलेले शीर्षक किनारा.
श्रेयनामावली
लेखक – जयवंत दळवी
दिग्दर्शक – वामन जोग
सूत्रधार – श्रीनिवास जोशी
निर्मिती साह्य – अविनाश काळे, अनंत आगाशे
नेपथ्य निर्माण, रंगभूषा – रामदास मोरे
रंगभूषा साह्य – पूर्वा जोगळेकर, प्राजक्ता जोशी
वेशभूषा – दीप्ती पंडित, मनाली जोशी
पार्श्वसंगीत – गणेश जोशी
पार्श्वसंगीत साह्य – अनिकेत आपटे
रंगमंच व्यवस्था – कौस्तुभ सरदेसाई, ओंकार जोशी, अविनाश काळे, मुक्ता जोशी
प्रकाशयोजना – मंगेश लाकडे
प्रकाशयोजना साह्य – संतोष दामले
विशेष साह्य – राजेंद्र पटवर्धन, मनोहर जोशी, उदय जोग
पात्रपरिचय
फडके – विजय जोशी
जिजी – अर्चना जोशी
यदुनाथ – अनिकेत आपटे
शामा – रेणुका सरदेसाई
शैला – भाग्यश्री अभ्यंकर
शिरूभाऊ – वामन जोग

असे होते कालचे नाटक
एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर शनिवारी (दि. १० डिसेंबर २०२२) रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्थेने रात्र संपली, पण उजाडलं कुठं? हे नाटक सादर केले.
हे नाटक १९७० च्या दशकातील असून पुरुषपात्रविरहित आहे. कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करत प्रेक्षकांच्या हृदयाला हळूवारपणे मायेचा स्पर्श करून जाणारे हे नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत साहित्य संघ मंदिरात २८ ऑगस्ट १९६७ रोजी आणि दुसरा प्रयोग ९ नोव्हेंबर १९६८ रोजी महिला कलादर्शक या संस्थेने सादर केला होता. एका वैभवसंपन्न मध्यमवर्गीय कुटुंबातील एका सच्छील गृहिणीची आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा आहे.
रात्र संपली की उजाडायला हृवे, अंधार संपताच प्रकाश पडायला हृवा, हा निसर्गाचा नियम आहे. पण जीवनात हा नियम नेहमी लागू पडतोच असे नाही. पुष्कळदा सारे आयुष्य निराशेच्या – दु:खाच्या अंध:काराने व्यापून जाते! प्रयत्नाने ते दु:ख दुर सारता येते… अंधार नाहीसा होतो, परंतु सुख लाभतेच असे नाही. प्रकाश दिसतोच, असे नाही. अशावेळी काय करायच, असा प्रश्न निर्माण होतो. दुःखाच्या अनुपस्थितीलाच सुख समजायचे का, असे वाटू लागते. मनुष्य नेहमीच सुखाच्या शोधात असतो. सुख मिळवणे हेच त्यांच्या जीवनातले एकमेव ध्येय असते! फक्त त्याचे प्रकार निरनिराळे असू शकतात. पण एखादेवेळी खाचखळगे पार करून संकटाशी झगडून सुख प्राप्त झाल्याच्या समाधानात आयुष्याची वाट चालत असावे आणि नेमके तेच खाचखळगे वेगळे रूप घेऊन वाटेत आडवे यावे. मग मनुष्य गडबडतो – भांबावतो! त्यातून दोन व्यक्ती जन्मभरासाठी एका सूत्राने बांधल्या जातात, तेव्हा त्यांची सुखदुःखे एकमेकांशी निगडीत असतात. अशाच एका गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल करणाऱ्या आशयाचे हे नाटक आहे.
श्रेयनामावली
लेखन – सौ. लीला फणसळकर
दिग्दर्शन – मनोहर जोशी
रंगभूषा – रामदास मोरे, केतकी जोशी
वेषभूषा – सौ. संगीता जोशी
वेशभूषा सहाय्य – सौ. अनुराधा जोशी
नेपथ्य – रामदास मोरे आणि सहकारी
रंगमंच व्यवस्था – अरुण मुळ्ये, प्रकाश जोशी, चेतन जोशी.
ध्वनिसंयोजन – अरुण जोशी
प्रकाशयोजना – शेखर मुळ्ये
पार्श्वसंगीत – निखिल जोशी
विशेष सहाय्य – सौ. श्वेता जोगळेकर,
श्री आदित्येश्वर प्रासादिक नाट्यमंडळ, वरवडे आणि खल्वायन, रत्नागिरी
सूत्रधार – सौ. संगीता जोशी
पात्रपरिचय
नर्मदा – सौ. नीता जोशी
कालिंदी – सौ. जाह्नवी जोशी
सरिता – सौ. धनश्री जोशी
शरयू – कुमारी अपूर्वा जोशी
यमुनाबाई – कुसारी प्राजक्ता जोशी
मंदाकिनी – सौ. शुभा जोशी
…………………
रात्र संपली, पण उजाडलं कुठं? नाटकातील काही क्षणचित्रे
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड











