मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य देश-विदेशात जावे : भारत सासणे

पोंभुर्ले (ता. देवगड) : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे संस्मरणीय कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे, अशी अपेक्षा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.

तळेरे येथील विशाल कडणे दुसऱ्यांदा `भांडुप भूषण`

तळेरे (ता. कणकवली) : समाजसेवेत सातत्य आणि चिकाटी असली की समाज आपोआपच आपल्याला गौरवतो. मूळच्या तळेरे (ता. कणकवली) येथील विशाल कडणे या उच्चविद्याविभूषित तरुणाने दुसऱ्यांदा भांडुप भूषणपुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे.

दिशान्तरच्या एकात्मिक शेती कार्यशाळेत महिला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण : एकत्र कुटुंबे विभक्त झाली, ती विभक्तता शेतीत आली. पण नव्या युगाची आधुनिकता शेतीत का अवतरली नाही, हा प्रश्न घेऊन येथील दिशान्तर संस्थेतर्फे आयोजित एकात्मिक शेती कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेडमधील महिला शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.

ठाकर आदिवासी कला आंगण पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे : तहसीलदार पाठक

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्टचे लोककला जपण्याचे काम स्तुत्य आहे. त्याला अधिक चालना मिळाली पाहिजे. ठाकर आदिवासी कला आंगण हे एक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास यावे, असे उद्गगार कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी काढले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात सोमवारपासून पहिला कोकण चित्रपट महोत्सव

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.