रत्नागिरी जिल्ह्यात १७३ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गातही ७६ जणांची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३) सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांची विक्रमी नोंद झाली आहे. आज १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४३७२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रुग्णसंख्या १४८४ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पास नको; पण १४ दिवस होम क्वारंटाइन आवश्यक

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउन शिथिल करण्यासाठी सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेशासाठी ई-पासची आवश्यकता नाही. मात्र येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे, असे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत विक्रमी १४२ करोनाबाधितांची नोंद; सिंधुदुर्गात ५० वाढले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत विक्रमी १४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१९९ झाली आहे. या काळात ७४ रुग्ण करोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात आज ५० नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १४०८ झाली आहे.

नव्या १२५ करोनाबाधितांमुळे रत्नागिरीतील रुग्णसंख्या चार हजारांवर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १) एकाच दिवशी १२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४०५७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७१ नवे बाधित सापडल्याने बाधितांची संख्या १३५८ झाली आहे.

रत्नागिरीत नवे ५१ करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३१) नव्या ५१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९३२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १२८७ झाली आहे.

करोनाचे रत्नागिरीत ९४, तर सिंधुदुर्गात १५६ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३०) नव्या ९४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३१२२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या १५६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६५ झाली आहे.