रत्नागिरी जिल्ह्यात १७३ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गातही ७६ जणांची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३) सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांची विक्रमी नोंद झाली आहे. आज १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४३७२ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रुग्णसंख्या १४८४ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरीत आज आढळलेल्या १७३ पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली १, खेड २, चिपळूण १७, संगमेश्वर ७, रत्नागिरी २५, लांजा ८. (एकूण ६०). रॅपिड अँटीजेन टेस्ट – दापोली १, खेड ५२, गुहागर ५, चिपळूण २३, रत्नागिरी २३, लांजा ९. (एकूण ११३).

आज बरे झालेल्या ४९ बाधितांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे वाटल्याने घरी गेलेल्यांची एकूण संख्या २८८३ झाली असून, ही टक्केवारी ६५.९४ इतकी आहे.

आज रत्नागिरीतील ७० वर्षीय आणि मंडणगड येथील ६० वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित मृतांची एकूण संख्या १४१ झाली असून, मृतांचे प्रमाण ३.२२ टक्के आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ७३६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांखाली आहेत. होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या आता कमी होऊ लागली असून, आज ५९०८ जण गृह विलगीकरणात आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४८४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ६४१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८१९ जण करोनावर मात करून घरी गेले आहेत. अजून २८५ अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात २६३ कंटेन्मेंट झोन आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply