भाद्रपद कृ. प्रतिपदा, शके १९४२
॥ श्रीराम ॥ लवथवित मलपे दोंद । वेष्टित कटर नागबंद । क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६ ॥
अर्थ : त्याचे विशाल पोट थलथलते. जिवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीची लहान लहान घुंगरे अगदी मंद आवाजाने झणत्कार करतात.
…….
१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.