करोनाचे रत्नागिरीत ९४, तर सिंधुदुर्गात १५६ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३०) नव्या ९४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३८८१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्या १५६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या ५० रुग्णांमध्ये दापोलीतील १०, खेड ११, गुहागर ९, चिपळूण ८, रत्नागिरी १० आणि लांजा २ अशा ५० जणांचा समावेश आहे. आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या ४४ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय १३, दापोली २, गुहागर २, चिपळूण ३, संगमेश्वर १७, राजापूर २ आणि लांजा ५.

आज रत्नागिरीतून ५, कळंबणी १, कामथे ३, देवरूख ३, सामाजिक न्याय भवन ५, घरडा ५ आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयातील १ अशा २३ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २४५३ झाली आहे.

आता जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या ५६९ आहे. होम आयसोलेशनमध्ये खेड आणि दापोलीत प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ८१, गुहागर तालुक्यात २०, संगमेश्वरमध्ये १७ आणि राजापूरमध्ये १ अशा १२३ जणांचा समावेश आहे.

आज नव्या एकाही मृत्यूची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३२ एवढी आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १५६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १२६५ झाली आहे. सध्या ६०५ रुग्णांवर उपचार सुरू असून, ६४१ जण बरे होऊ घरी गेले आहेत. आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात दोन मेपासून दोन लाख सहा हजार ३३५ जण आले असून, सध्या ११ हजार ४२८ जण विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सध्या १६१ कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४१३ चाचण्या झाल्या असून, त्यापैकी १२ हजार १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply