रत्नागिरीत नवे ५१ करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ३१) नव्या ५१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९३२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १२८७ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – रॅपिड अँटीजेन टेस्ट – दापोली १३, खेड ३, रत्नागिरी १२, लांजा २, एकूण ३०, आरटीपीसीआर – रत्नागिरी ९, चिपळूण ९, संगमेश्वर ३ – एकूण २१.

आज ५९ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामध्ये होम आयसोलेशनमधील चौघांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या २५६८ झाली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये १२४ जण असून, त्यामध्ये खेड आणि दापोलीत प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ८२, गुहागर २०, संगमेश्वर १७ आणि राजापूर तालुक्यात एक जण आहे.

आज जिल्ह्यात तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुले एकूण मृतांची संख्या १३५ झाली आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – मंडणगड १, खेड १५, दापोली २१, चिपळूण २९, गुहागर ४, संगमेश्वर ११, रत्नागिरी ४३, लांजा ३ आणि राजापूर ८.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२८७वर पोहोचली आहे. सध्या १०४ अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६६८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, ५९९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या १० हजार ९९९ व्यक्ती अलगीकरणात आहेत. सिंधुदुर्गात आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा बळी गेला आहे.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply