रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १) एकाच दिवशी १२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४०५७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७१ नवे बाधित सापडल्याने बाधितांची संख्या १३५८ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या बाधितांचा तपशील असा – अँटीजेन टेस्ट – खेड २७, गुहागर ३, चिपळूण १९, रत्नागिरी १९, लांजा ४ – एकूण ७२. आरटीपीसीआर – मंडणगड २, दापोली २, खेड १०, गुहागर ८, चिपळूण १३, रत्नागिरी १६, लांजा २ एकूण ५३.
आज बरे झालेल्या ५५ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या २७०० झाली आहे. हे प्रमाण ६६.५५ टक्के आहे. आज दोघा मृतांची नोंद झाली. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १३७ झाली असून, हे प्रमाण ३.३७ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या १३५८ झाली आहे. अद्याप १८५ अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात ६१० रुग्णांवर उपचार सुरू असून, ७२५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १० हजार ४४७ व्यक्ती विलगीकरणात असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत २२१ कंटेन्मेंट झोन आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
