भाद्रपद पौर्णिमा, शके १९४२
॥ श्रीराम ॥ दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट । तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघुलघु ॥ १५॥
अर्थ : त्याचे दात घट्ट आणि पांढरे शुभ्र आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचे कडे आहे. कड्याच्या खाली लहान लहान सोन्याची पाने चमकताना दिसतात.
…….
१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.