रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत विक्रमी १४२ करोनाबाधितांची नोंद; सिंधुदुर्गात ५० वाढले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत विक्रमी १४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१९९ झाली आहे. या काळात ७४ रुग्ण करोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात आज ५० नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १४०८ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
गेल्या चोवीस तासांत रत्नागिरी, चिपळूण आणि लांजा तालुक्यात अधिक रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या १४२ नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड १, गुहागर ११, चिपळूण १५, संगमेश्वर १०, रत्नागिरी २३, लांजा ४, राजापूर २ (एकूण ६६). रॅपीड अँटीजेन टेस्ट – दापोली ११, खेड ७, गुहागर ४, चिपळूण १९, रत्नागिरी १७, लांजा १८ (एकूण ७६).

आज बरे झाल्याने ७४ रुग्णांना घरी पाठविल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या २७७४ आहे. आज दोघा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित मृतांची संख्या १३९ झाली आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे ५० नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या १४०८ झाली आहे. सध्या ५८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७९६ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २३ रुग्णांचा बळी गेला आहे. अद्याप २१६ अहवाल प्रलंबित आहेत. सध्या जिल्ह्यात २४८ कंटेन्मेंट झोन आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply