देवरूख : येथील मातृमंदिरच्या गोकुळ बालिकाश्रमातील मुलींनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त साकारलेले आकाशकंदील आणि इतर आकर्षक, उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनाझचे विनय पानवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : येथील मातृमंदिरच्या गोकुळ बालिकाश्रमातील मुलींनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त साकारलेले आकाशकंदील आणि इतर आकर्षक, उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनाझचे विनय पानवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
देवरूख : देवरूख परिसरातील कलाकारांनी बाजारपेठेला आवश्यक असलेल्या वस्तू तयार केल्यास आपण त्याला बाजारपेठ मिळवून देऊ, असे आश्वासन उद्योजक अजय पित्रे यांनी दिले.
रत्नागिरी : मातीकामामध्ये नवीन कलाकार घडवण्यासाठी संगमेश्वर तालुका गणेशमूर्तीकार संघटना आणि देवरूख येथील डी-कॅड कला महाविद्यालयाने येत्या १० ऑक्टोबर रोजी मातीची गणेशमूर्ती बनवणे स्पर्धा आयोजित केली आहे.
देवरूख : येथील सोळजाई देवीची दोनशे वर्षांपासून दरवर्षी देवदिवाळीला होणारी लोटांगण यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे.
करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.
देवरूख : कोकणातील मुलांना रोजगाराची संधी मिळवून देणारे कोकणातील पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र येथील आठल्ये, सप्रे, पित्रे स्वायत्त महाविद्यालयात सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ येत्या २६ ऑक्टोबरला होणार आहे.