देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला.
‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूंना मूँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरीत तयार होणारी शस्त्रे असतील, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. ते आज देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आढाव्यातील प्रत्येक बाबीचा ऊहापोह करणे शक्य आहे. पिण्याचे पाणी, कचरा, गटारे अशा सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविल्याचे चित्र त्यात दिसत नाही. कोट्यवधींचा खर्च होत असताना लाखाच्या किंवा केवळ काही हजारांच्या खर्चाच्या तरतुदीची अपेक्षा असणाऱ्या सुविधा दुर्लक्षित राहतात. किंबहुना हजार आणि लाखातल्या योजना आखायच्याच नाहीत, असे ठरवून टाकले असावे. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष करताना सर्वसामान्य जनता अशा छोट्या छोट्या गैरसोयींच्या पारतंत्र्यातून सुटकेची वाट पाहत असते.
रत्नागिरी : रत्नागिरीत आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य समारंभात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या (पावस, रत्नागिरी) आणि अखिल भारतीय कीर्तन कुलाच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने वर्षभर पार पडलेल्या गर्जा जयजयकार क्रांतीचा कीर्तनमालिकेतून जवानांसाठी २५ हजाराची मदत देण्यात आली.
रत्नागिरी : वेगवेगळ्या युद्धात बलिदान करणारे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. ती पुस्तकरूपाने पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.