मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात शास्त्रीय गायनात तन्वी मोरेला रौप्यपदक

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.

रत्नागिरीत भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांनी कुरतड्यात केली पाहणी; १२०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण

रत्नागिरीत भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांनी कुरतड्यात केली पाहणी; १२०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण

शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज
रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावातील कातळवाडी, तसेच डुगवे गावाच्या
परिसरात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर पोहोचल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

वैयक्तिक यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफतच; केवळ चार टक्के मोठ्या व्यापारी व्यवहारांवरच ०.४ टक्के शुल्क

वैयक्तिक यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफतच; केवळ चार टक्के मोठ्या व्यापारी व्यवहारांवरच ०.४ टक्के शुल्क

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या यूपीआय धोरणामुळे नागरिकांमध्ये
संभ्रम निर्माण झाला आहे; मात्र एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे
पाठवलेल्या पैशांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले
आहे. नव्या MDR व्यवस्थेचा परिणाम केवळ सुमारे चार टक्के व्यापारी व्यवहारांवर
होणार आहे.

रत्नागिरीकर प्रसाद देवस्थळींचा हिमालयात झेंडा! खडतर खार्दुंग ला चॅलेंज यशस्वीरीत्या केली पूर्ण

रत्नागिरीकर प्रसाद देवस्थळींचा हिमालयात झेंडा! खडतर खार्दुंग ला चॅलेंज यशस्वीरीत्या केली पूर्ण

अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा
रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी
कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत.

कोकणातील निसर्ग व जैवविविधतेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

कोकणातल्या वनसंपदेवर संशोधनासाठी अभ्यासक्रमाला आवश्यक निधी देण्याची उदय सामंत यांची ग्वाही

‘कोकणातला निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणं गरजेचं आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यांना जिल्हा नियोजन समिती, तसंच सिंधुरत्न योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.