रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले. ५९व्या आंतरमहाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सवासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये तिने हे पदक पटकावले. तन्वी मोरे हिला सौ. विनया परब (रत्नागिरी) यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभते. तिला स्पर्धेमध्ये स्वरूप नेने (तबला), श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी तन्वीचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

