रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मदतीचे तीनशे हात

करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी काम करत आहेतच, पण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे सेवावृत्तीने तीनशे हात प्रशासनाला मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी

रत्नागिरी : जिल्ह्यातील कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा

रत्नागिरीच्या ‘हेल्पिंग हँड्स’चा असाही मदतीचा हात

करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.

लॉकडाउनमध्ये शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे; रत्नागिरीतील तरुण प्राध्यापकाचा उपक्रम

पुण्यात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या शौनक माईणकर या तरुण प्राध्यापकाने लॉकडाउनच्या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्टॉक टॉक असे या कोर्सचे नाव. शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करू इच्छिणारी कोणीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते.

आमच्या परगण्यात आम्हीच शासन

दोन-दोन परगण्यांची जहागिरी सांभाळणे तसे काही सोपे नाही. आम्ही शासन आहोत हे पदोपदी सांगावे लागते, पण सांगण्यापेक्षा कृतीवर आमचा भर अधिक आहे. त्यामुळे राज्याचे सारे सैनिक आपापल्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, याची पाहणी आम्हाला अधूनमधून करावी लागते. कधी आम्हाला बहिर्जी नाईक यांची आठवण होते, तर कधी शिवप्रभूंची. पण आठवणीत रममाण होण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो.

लष्करी कारवाईची वेळ येऊ देऊ नका!

संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक