बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ६ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचा यावर्षीचा एक कर्तव्यनिष्ठा पुरस्कार आणि ५ कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षी सर्व पुरस्कार कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी, रत्नागिरी संघ विजेते

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालय आणि रत्नागिरीतील एस. बी. कीर विधी महाविद्यालय सांघिक चषकाचे मानकरी ठरले.

लक्ष्मणराव आचरेकर यांना ज्येष्ठ सेवा पुरस्कार जाहीर

आचरे (मालवण) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी संस्थेचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव आचरेकर यांना जाहीर झाला आहे.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे १२ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल पुरस्कारांच्या तपपूर्तीनिमित्ताने यावर्षी १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

यंदाचा स्वरसिंधुरत्न किताब शुभम राणे आणि दत्तराज च्यारी यांना

प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. शुभम राणे आणि दत्तराज च्यारी यांची यंदाच्या स्वरसिंधुरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग म्हणजे कलाकारांची खाण : सतीश पाटणकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे. या भूमीने महाराष्ट्राच्या कला संचालनालयाला सर्वाधिक संचालक दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी केले.