स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी, रत्नागिरी संघ विजेते

रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालय आणि रत्नागिरीतील एस. बी. कीर विधी महाविद्यालय सांघिक चषकाचे मानकरी ठरले.

वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे बाविसावे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे सोळावे वर्ष होते. राज्यातील तरुण पिढीची सांगड अध्यात्म, नैतिकता आणि समाजविकास यांसोबत घालावी या उद्देशाने ही वक्तृत्व स्पर्धा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात येते.

स्पर्धेचा गुणानुक्रमे सविस्तर निकाल असा – कनिष्ठ गट – अनुश्री मनोज झाजम (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), अदिती अवधूत राजाध्यक्ष (राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी), उमा सुनील तावडे (माध्यमिक आश्रमशाळा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, निवे), उत्तेजनार्थ प्राची गोविंद सावंत (आरपीडी, सावंतवाडी), तृप्ती आप्पासो मदने (शिरगाव ज्युनिअर कॉलेज शिरगाव, चिपळूण). कनिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ट संघ मार्गदर्शक पुरस्कार आरपीडीच्या श्रीमती महाश्वेता अनंत कुबल यांना देण्यात आला.

वरिष्ठ गट – श्रेया उमेश कुलकर्णी, वंशिता अजित भाटकर (दोघी एस. बी. कीर विधी महाविद्यालय,रत्नागिरी), सानिया उदय यादव (कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लांजा), उत्तेजनार्थ रोजीना मुसा साबळे (कला आणि विज्ञान महावि‌द्यालय, सावर्डे), ओंकार मंदार आठवले (गोगटे -जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी). वरिष्ठ गटातील सर्वोत्कृष्ट संघ मार्गदर्शक म्हणून कीर विधी महाविद्यालयाच्या सौ. संयोगिता शिरीष सासने यांना गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला पावसचे स्वामी अद्वयानंद अभ्यागत म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विकसित भारत निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांची आध्यात्मिक प्रगती होणे ही काळाची गरज आहे. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे काम उत्तम रीतीने करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. वक्तृत्व ही कला आहे. त्याची साधना प्रत्येकाने मनापासून करावी, असे विचार त्यांनी मांडले.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर बक्षीस समारंभास उपस्थित होते. सौ. मंजिरी गोखले आणि सौ. पौर्णिमा साठे यांनी कनिष्ठ गटाचे तसेच सुकांत चक्रदेव आणि प्रतीक कळंबटे यांनी वरिष्ठ गटाचे परीक्षण केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply