सिंधुदुर्ग म्हणजे कलाकारांची खाण : सतीश पाटणकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे. या भूमीने महाराष्ट्राच्या कला संचालनालयाला सर्वाधिक संचालक दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी केले.

डी. जी. बांदेकर ट्रस्ट संचालित बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्टच्या फाउंडेशन कोर्स इन आर्टचे ”कसब २०२४” हे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे, असे सांगून श्री. पाटणकर म्हणाले की, आज विकासप्रक्रियेमुळे सर्वच क्षेत्रांत बदल होत आहेत. पायाभूत सुविधांमध्येही बदल होत असताना सावंतवाडीसारख्या प्रगत शहरालाही भविष्यात शिक्षण आणि कला संस्कृतीचा हब होण्यासाठी कास धरण्याची गरज आहे. आजही या जिल्ह्यातील कलाकार कलाक्षेत्रात सिंधुदुर्गचे नाव मोठी करीत आहेत. सावंतवाडीतील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट महाविद्यालय विद्यार्थ्याच्या कलागुणांना पैलू पाडण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कार्यात सर्वांनी योगदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पेठे, खजिनदार गीता बांदेकर,सचिव अनुराधा बांदेकर-परब, अध्यक्ष गोविंद बांदेकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुकाराम मोरजकर आणि प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी केले, तर आभार प्रा. वेंगुर्लेकर यांनी मानले.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सदस्य रमेश पै, प्रकाश मसुरकर, शाम भाट, अॅड. क्षितुज परब आदी मान्यवर उपस्थित होते. कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंद बांदेकर आणि सचिव अनुराधा बांदेकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply