साप्ताहिक कोकण मीडियाचा १० जुलैचा अंक डाउनलोड करा…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाचा १० जुलैचा अंक डाउनलोड करा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी पाच व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० झाली आहे.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ४) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नव्या १३ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६९६ झाली आहे. राजापूर शहरात पहिला रुग्ण सापडला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या २४ तासांत १३ रुग्णांची वाढ झाल्याने, तेथील रुग्णांची एकूण संख्या २४२ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. २) सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार आणखी २२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६८३ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गातील बाधितांची संख्या २२९ आहे.
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत सुरू होईल, तर रत्नागिरीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री उदय सामंत यांनी आज (तीन जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण पुढे करून स्थानिक प्रशासनाने एका आठवड्याचे कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. पाच टप्प्यांमध्ये झालेल्या लॉकडाउनमध्ये तीन महिने काढल्यानंतर आत्ताच कुठे हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले होते. उद्योगधंदे सुरू झाले होते. ज्यांचे रोजगार आणि व्यवसाय बंद पडले, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. अनेक पारंपरिक व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू झाले होते. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांची ठप्प पडलेली गाडी पुन्हा एकदा वेग घेईल असे वाटत होते. त्याच वेळी पुन्हा एकदा कोकणात ल़ॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा त्या सर्व व्यवहारांना खीळ बसली आहे.