खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे…; उर्दू शाळेतल्या प्रार्थनेने भारावले हवालदार

तसं पाहायला गेलं, तर हा प्रसंग खूप मोठा आहे असं नाही; पण आजच्या काळात सर्व प्रकारच्या अस्मिता टोकदार झाल्यामुळे द्वेषाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिसत असताना संवेदनशीलता जागृत असेल, तर जगाला प्रेम अर्पण करण्याच्या धर्माचा विसर पडणार नाही, याची जाणीव यातून होते, एवढं मात्र नक्की.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

सु. द. भडभडे यांच्या `अंतरंग`ला कोमसापचा पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे यांच्या अंतरंग या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. याशिवाय दोन वर्षांचे वाङ्मयीन पुरस्कार परिषदेने जाहीर केले आहेत.

‘कोमसाप’च्या प्रतीक्षेत साहित्यप्रेमी

कोमसाप या संस्थेत अजूनही असलेली धुगधुगी वाढवायची असेल, तर अशा छोट्या संमेलनांबाबत कोमसापने पुन्हा एकदा विचार करायला हवा.
……..
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ै२ एप्रिल २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय वाचा पुढील लिंकवर…

प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे अभिमानास्पद : भिसळे

चिंदर (ता. मालवण) : प्राथमिक शिक्षक हा मुळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी केले.

साने गुरुजी कथामालेचा नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे.