‘फलोद्यानाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील’; डॉ. जी. डी. जोशींनी दिली विविध संधींची माहिती

राजापूर : भात आणि नाचणीच्या आतबट्ट्याच्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी केले.

रत्नागिरीच्या प्रयोगशाळेतील करोना तपासणीच्या गतीमध्ये वाढ; २४ तासांत ९८ नवे रुग्ण

रत्नागिरी : प्रयोगशाळेमधील सरासरी दैनिक तपासणीच्या गतीत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्याची नोंद राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. गेल्या तीस दिवसांत दररोज सरासरी १७९ तपासण्यांचा दर असलेल्या रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरात दररोज २४९ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यासोबतच अँटीजेन तपासण्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

शासकीय अनास्थेचा बळी ठरलेले हॉस्पिटल

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय…

रत्नागिरीतील रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला; मृत्युसंख्या ९१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाच्या तपासणीसाठी २१ हजार ३८० नमुने घेण्यात आले. त्यापैकी २५८० जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा माहिती कार्यालयाने आज (ता. १३) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. आज एकाच दिवशी १५३ जणांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले.

‘श्रावणातले कोकण’ या विषयावर ‘लेन्स आर्ट’तर्फे फोटोग्राफी स्पर्धा

रत्नागिरी : सध्या सुरू असलेला श्रावण महिना आणि १९ ऑगस्ट रोजी येत असलेला जागतिक छायाचित्रण दिन यांचे औचित्य साधून रत्नागिरीतील लेन्स आर्ट या संस्थेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रावणातले कोकण असा त्या स्पर्धेचा विषय आहे.

कोकणात रेल्वेगाड्या सोडण्यासाठी कोकण रेल्वे समन्वयक समितीचे आता फडणवीसांना साकडे

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गणपती गाड्या सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्याला यश आले नसल्याने कोकण रेल्वे समन्वयक समितीने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.