रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे यंदाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने २०२० सालचे विविध पुरस्कार आज (११ ऑगस्ट) जाहीर केले. कोणतेही अर्ज न मागवता विविध माध्यमांतून माहिती मिळवून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पत्रकार अरुण आठल्ये, डॉ. बाळकृष्ण पाध्ये, कीर्तनकार अनंत कर्वे, उद्योजक विनायक वाकणकर, वेदमूर्ती सुयोग पाध्ये आणि शिक्षिका सौ. अनघा प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ६५ करोनाबाधितांची भर; दिवसभरात पाच मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ९) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत ६५ जणांची भर पडली असून, करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या २२१३ झाली आहे. आजच्या दिवसभरात पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ७८ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४८९ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ६७.२ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवे रुग्ण; चार मृत्यू

रत्नागिरी : आज (आठ ऑगस्ट) रात्री साडेआठनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २०१४

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने आज (पाच ऑगस्ट) दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. आज सापडलेल्या २२ नव्या रुग्णांमुळे बाधितांची संख्या २०१४ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीत १७, तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये तिघे रुग्ण आढळले आहेत. तसेच, रात्री उशिरा दोन नवे रुग्ण आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले आहेत.

देवळात पाणी भरूनही नामसप्ताहात खंड नाही

रत्नागिरी : पुरामुळे देवळात छपरापर्यंत पाणी भरले, तरीही तोणदे (ता. जि. रत्नागिरी) येथील ग्रामस्थांनी श्रावणातील नामसप्ताहात खंड पडू दिला नाही.

रत्नागिरीतील आर्टिस्ट्री समूहातर्फे अनोखी पावसाळी फोटोग्राफी स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्टिस्ट्री या नवतरुणांच्या समूहाने एक अनोखी पावसाळी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. पावसाच्या थेंबांचे सौंदर्य मनोहारी असते. प्रत्येकाला त्याचे वेगवेगळे रूप दिसते, आवडते, भावते. पावसाच्या थेंबांचे हेच मोहक सौंदर्य टिपून ते फोटो स्पर्धेसाठी पाठवावेत, असे आवाहन आर्टिस्ट्री परिवारातर्फे करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, आर्टिस्ट्रीच्या पुढील प्रदर्शनात विजेत्या फोटोंना स्थान दिले जाणार आहे.