रत्नागिरी : आज (आठ ऑगस्ट) रात्री साडेआठनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२१० झाली आहे. तसेच, आज चार मृत्यूंची नोंद झाली असून, ३३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या ६२ नव्या रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी ४, कामथे ४४, लांजा १, गुहागर ४, दापोली ५ आणि अँटिजेन टेस्टमधील ४.
आज ३३ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४७९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय ९, समाजकल्याण भवनातील १९, कामथे, चिपळूण ४ आणि कळंबणी, खेड येथील एक रुग्ण आहे.
घारेवाडी, चिपळूण येथील ५८ वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ४३ वर्षे वयाच्या एका व्यक्तीचा अहवाल काल सायंकाळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळंबणी येथे दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. एका ७० वर्षीय महिलेचादेखील आज मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण दापोली तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे. तसेच गेल्या २५ जुलै रोजी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तो उशिरा प्राप्त झाल्याने त्याची नोंद आज घेण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी २०, खेड ६, गुहागर २, दापोली १६, चिपळूण १४, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.
संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या १२७ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी ४७, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे २६, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी १४, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ४, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर १, संगमेश्वर १, पाचल १.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यांतून आल्या होम क्वारंटाइन केलेल्यांच्या संख्येत आजही वाढ झाली असून, ती आता ३७ हजार ४१७ झाली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
