रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्टिस्ट्री या नवतरुणांच्या समूहाने एक अनोखी पावसाळी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. पावसाच्या थेंबांचे सौंदर्य मनोहारी असते. प्रत्येकाला त्याचे वेगवेगळे रूप दिसते, आवडते, भावते. पावसाच्या थेंबांचे हेच मोहक सौंदर्य टिपून ते फोटो स्पर्धेसाठी पाठवावेत, असे आवाहन आर्टिस्ट्री परिवारातर्फे करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, आर्टिस्ट्रीच्या पुढील प्रदर्शनात विजेत्या फोटोंना स्थान दिले जाणार आहे.
आर्टिस्ट्री हा १७ ते २२ या वयोगटातील तरुणांचा समूह असून, या समूहातील सदस्य विविध कलाप्रकारांशी संबंधित आहेत. आपल्या विविध कलाप्रकारांचे प्रदर्शन त्यांनी गेल्या वर्षी रत्नागिरीत भरविले होते. त्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. म्हणूनच यंदा या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाळी फोटोग्राफी स्पर्धेचे नियम –
- फोटो मोबाइल किंवा डीएसएलआर कॅमेऱ्यामधून काढलेला असावा.
- फोटो JPG/JPEG फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.
- प्रत्येक स्पर्धकाला एकच फोटो पाठवता येईल.
- फोटोसोबत स्वतःचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक ही माहिती पाठवणे आवश्यक.
- फोटोवर कोणताही वॉटरमार्क अथवा लोगो नसावा.
- स्पर्धेसाठी प्रवेशमूल्य २० रुपये असून, ते सोबतच्या कोणत्याही एका क्रमांकावर गुगल-पेद्वारे पाठविणे आवश्यक
- फोटो पाठविण्यासाठी ई-मेल : artistryratnagiri@gmail.com
- फोटो पाठवण्याची अंतिम तारीख : १५ ऑगस्ट २०२०
- निकाल : १९ ऑगस्ट २०२० रोजी आर्टिस्ट्रीच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर जाहीर होईल.
अधिक माहितीसाठी आणि शुल्क पाठविण्यासाठी मोबाइल क्रमांक :
निमिष वैद्य- 9604521289
चिन्मय बेर्डे – 8087725071
श्वेता केळकर – 8805567573
राजश्री शिधये – 8605216200
……