तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

राजापूरची गंगा आली हो…!

राजापूर : जगात सर्वत्र करोना विषाणूने हाहाकार माजवलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे लॉकडाउनच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी आगमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री २९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा गंगामाईचे आगमन झाले. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगेचा प्रवाह सुरू झाला आहे.

खांबलवाडी ग्रामस्थांच्या पाणी योजनेला पहिल्याच दिवशी मिळाले पाणी

राजापूर : शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता राजापूरजवळच्या धोपेश्वर गावातील खांबलवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदान आणि स्वखर्चातून खासगी नळपाणी योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी खोदलेल्या विहिरीला पहिल्याच दिवशी पाणी मिळाल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

दरवर्षीचे सागरी पाहुणे यावर्षी आलेच नाहीत….

रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.

करोनाने दीप्ती शेडेकरांना दाखवली स्वतःच्या पायावर उभे राहायची दिशा

राजापूर : करोनातील लॉकडाऊनने कळसवली (ता. राजापूर) येथील सौ. दीप्ती दिनेश शेडेकर या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने रोजगाराची नवी दिशा दिली. त्यातून तिने ओणी येथे जिद्दीने स्वतःचे सुपर मार्केट सुरू केले आहे.