रत्नागिरीत प्लाझ्मा उपचार केंद्र सुरू; जिल्हा रुग्णालयात असे केंद्र झालेला पहिला जिल्हा

रत्नागिरी : करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र असलेल्या प्लाझ्मा थेरपीचे केंद्र आता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६८६ पथके

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १४) एकाच दिवशी सात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७५ झाली आहे. सिंधुदुर्गात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ४५ झाली आहे. रत्नागिरीत ८१, तर सिंधुदुर्गात ४७ नवे रुग्ण आज आढळले.

चाकरमान्यांसाठी करोनाप्रतिबंधक सोयी दुप्पट करणार : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकरिता करोनाप्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (पाच ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीतील लॉकडाउन शिथिल होणार?; भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन

रत्नागिरी : देशात व राज्यात अनलॉक अर्थात लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने

लॉकडाउनला विरोध, तरीही रत्नागिरीतील बंद शांततेत

जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन एक जुलैपासून आठ दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणाने सुरू झाली. पहिल्या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातले सर्वच व्यवहार बंद होते.

रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाउन

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन एक जुलैपासून रत्नागिरीत पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी, तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (२८ जून) रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.