साप्ताहिक कोकण मीडिया – आठ मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे आठ मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/4fy3xnn येथे क्लिक करा.

८ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : ‘माझी मुंबई’ चाकरमान्यांना सांभाळू शकत नाही? (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुख्यमंत्र्यांचा सहाध्यायी रत्नागिरीत उपयोजित कलेच्या नव्या संधीच्या प्रतीक्षेत…. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राज ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असतानाच सदानंद भोगले हेही तेथे शिकत होते. कलाविश्वात विविध ठिकाणी काम करून गेली काही वर्षे ते रत्नागिरीत वास्तव्याला आहेत. लॉकडाउनमुळे सध्या अन्य अनेक कलाकारांप्रमाणेच त्यांचेही रोजगाराचे साधन बंद आहे. कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत… त्यांच्याशी साधलेल्या संवादातून मांडलेले प्रश्न…

मुखपृष्ठकथा : चाकरमान्यांच्या घरवापसीचा कल्लोळ : करोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोकणात परतण्याच्या विषयावरून गेले काही दिवस बरीच चर्चा, घडामोडी सुरू आहेत. त्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजूंचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी घेतलेला आढावा…

करोना आणि आयुर्वेदाची उपयुक्तता : सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांचा लेख..

लॉकडाउन, पोलीस आणि मी… आगरी बोलीतील कथा…

कौसल्येक कितवो म्हयनो लागलो… अशोक प्रभू यांचा स्मरणरंजनपर लेख..

लॉकडाउन ३.० …. बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…

बालकथा – इच्छाधारी नाग… भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद

याशिवाय विविध विषयांवर वाचकांनी मांडलेले विचार…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply