रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे नवे ४० रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ६) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे नवे ४० रुग्ण आढळले असून, एकूण बाधितांची संख्या ७५० झाली आहे. रत्नागिरी शहरातील काही भागांसह मौजे कुर्धे हेही करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २४३ आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
काल (पाच जुलै) सायंकाळपासून ४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय – १०, उपजिल्हा रुग्णालय,कामथे – १४, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – १६.

आज जिल्हा रुग्णालयातून एका रुग्णाला, तर कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून नऊ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९४ झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे. सध्या एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२८ आहे. त्यापैकी तिघे होम क्वारंटाइन आहेत. नाचणे-गोडाऊन स्टॉप, सन्मित्रनगर, नाचणे- समर्थनगर, सीईओ बंगला, निवखोल, मच्छीमार्केट परिसर, मौजे कुर्धे ही रत्नागिरी तालुक्यातील सात क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यासह जिल्ह्यात ५७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १७, दापोली ९, खेड मध्ये ३, लांजा ६, चिपळूण १७, मंडणगडात एक आणि राजापूर तालुक्यात चार गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

सध्या ६० करोनाबाधित रुग्ण विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. बाहेरगावांहून आल्याने होम क्वारंटाइनखाली असलेल्यांची संख्या आता आणखी घटली असून, ती १५ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यांच्यासह परराज्यातून आणि इतर जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत आलेल्या चाकरमान्यांची संख्या एक लाख ६६ हजार १६४ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या ९० हजार २ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४३ झाली असून, त्यापैकी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १७९ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे.
……

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

One comment

Leave a Reply