रत्नागिरी : आज (२१ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७४ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या १३३६ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे सर्वाधिक १० मृत्यू दापोली तालुक्यात झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८, खेड ४, गुहागर २, चिपळूण ८, संगमेश्वर ६, लांजा १, राजापूर २, मंडणगड १, दापोली १०
आज (२१ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ७४ करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यापैकी संध्याकाळपर्यंतच्या ४७ बाधितांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – २१, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २४, कळंबणी – १, ॲन्टीजेन – १.
आज (२१ जुलै) रात्री २७ नवे रुग्ण सापडले. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी ११, कामथे ८, दापोली ४, गुहागर १, घरडा ३
आज १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७६८ झाली आहे. आज बरे झालेल्यांचा तपशील – जिल्हा कोव्हिड रुग्णालय १, संगमेश्वर २, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली १५ आणि कामथे,
चिपळूण १ .
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२६ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या २८० असून, त्यापैकी २४१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
