रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत १०२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतचे एकाच दिवशी सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
आज १०२ करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४३८ झाली आहे. आज आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४९ झाली आहे.
आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – २४, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ४८, दापोली – २, घरडा, खेड – २७, लांजा – १.
राजापूर येथील एका ६५ वर्षीय करोनाबाधिताचा, तसेच रत्नागिरीतील ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याची नोंद काल झाली होती. आज खेड येथे दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यांचे वय अनुक्रमे ७१ आणि ४० वर्षे आहे. चिपळूण येथे ४९ वर्षीय करोना रुग्णाचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या आता ४९ झाली आहे.
मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी – ९, खेड – ६, गुहागर – २, दापोली – ११, चिपळूण – ९, संगमेश्वर – ६, लांजा – २, राजापूर – ३, मंडणगड – १.
दरम्यान, ४५ रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८५८ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील ६, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली येथील ३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन येथील २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड येथील २१, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, गुहागर येथील ३ आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील १० जणांचा समावेश आहे. आजच्या एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३१ आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
