रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६१ रुग्ण आढळले. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता हाती आलेल्या तपशीलानुसार ३२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५२१ झाली आहे. सिंधुदुर्गातील बाधितांची एकूण संख्या ३१३ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या बाधित रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी – ३१, घरडा, खेड – ११, दापोली- ४, कळंबणी- १५. आज रात्री सापडलेल्या ३२पैकी १८ जण रत्नागिरीतील आणि १४ जण दापोलीतील आहेत.
दरम्यान, ४६ रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९०४ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील ५, संगमेश्वरातील १, कोव्हिड केअर सेंटर वेळणेश्वर येथील ५, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली येथील ८, उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथील १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन येथील ४, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड येथील १२, कोव्हिड केअर सेंटर, पाचल येथील ५ आणि कोव्हिड केअर सेंटर, मंडणगड येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४९ आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७८ आहे.
आज जुना माळनाका, कोतवडे सनगरेवाडी, लांजेकर कम्पाउंड, भागीर्थी अपार्टमेंट, फिनोलेक्स कॉलनी, क्रांतीनगर, झारणी रोड, आरोग्य मंदिर, स्टँडर्ड अपार्टमेंट, रत्नागिरी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २६, दापोली तालुक्यात २, खेड ३५, लांजा ६, चिपळूण ६५, मंडणगड ३, गुहागर ८, आणि राजापूर तालुक्यात ३ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणासाठी ११७ रुग्ण विविध ठिकाणी दाखल आहेत. त्यांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ८३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १५, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे २, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – ३, केकेव्ही, दापोली – १३.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या १८ हजार ७३ आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत १५ हजार ४१५ नमुने करोनाविषयक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी १४ हजार ९६७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक हजार ४९९ पॉझिटिव्ह, तर १३ हजार ४९९ निगेटिव्ह आहेत. आणखी ४४८ नमुन्यांचा अहवाल रत्नागिरीच्या प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहे. त्यामध्ये घरडा केमिकल्सच्या खासगी लॅबचे आकडे समाविष्ट नाहीत.
परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत (ता. २३) रत्नागिरी जिल्ह्यात एकूण दोन लाख सहा हजार ६९५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या एक लाख दोन हजार ३८१ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज सहा नवे रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३१३ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
