साप्ताहिक कोकण मीडिया – २४ जुलैचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २४ जुलै २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/2u8a1el येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध होईल.

२४ जुलैच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : नोकरीच्या महाद्वाराकडे बेरोजगार कोकणाची पाठ https://kokanmedia.in/2020/07/24/mahajobskokan/

मुखपृष्ठकथा : समन्वयातून परीक्षांचा घोष संपवायला हवा… कोकण मीडियाच्या मागील अंकातील लेखांवर विविध वाचकांनी पाठवलेल्या प्रतिक्रिया आणि मांडलेले विचार…

‘ते’ तेवढे अत्यावश्यक, सामान्य नागरिक म्हणजे अनावश्यक? – ‘करोना डायरी’ सदरात किरण आचार्य यांचा लेख…

धन्वंतरीचे दूत, गरिबांचे डॉक्टर भाऊकाका जोशी – रविकिरण भिडे यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख https://kokanmedia.in/2020/07/22/bhaukakajoshi/

डॉ. भाऊकाका जोशी – वेगळे रसायन असलेली व्यक्ती आणि वल्ली – डॉ. मधुकर घारपुरे (सावंतवाडी) यांचा लेख

संदर्भ बदललेला श्रावण – संगमेश्वर येथील प्रसाद भिडे यांचा ललित लेख

आत्महत्येला बळी पडू नका – समुपदेशक श्रद्धा कळंबटे यांचा लेख…

आठवणींचा कप्पा – शिरोडा (देवगड) येथील महेश सुमती विजय शिरोडकर यांचा ललित लेख

मन रुजे शेतावर – हसोळ (ता. राजापूर) येथील अविनाश लाड यांची कविता

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply