रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे २१ नवे रुग्ण सापडले. तसेच, आज रात्री साडेनऊ वाजल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण ५६ रुग्णांची भर पडली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १५५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३१९ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे –
रत्नागिरी – १५ रुग्ण
दापोली – २१ रुग्ण
कामथे – २० रुग्ण
यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५५५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ५५३ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.
आज (२५ जुलै) ४९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रत्नागिरीतील रुग्णांची संख्या ९५३ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली येथील आठ, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील दोन, कोव्हिड केअर सेंटर समाजकल्याण येथील एक, कोव्हिड केअर सेंटर घरडा, खेड येथील २६, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे येथील १२ रुग्ण आहेत.
ॲक्टिव्ह कन्टेन्मेन्ट झोन
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २६ गावांमध्ये, दापोलीमध्ये २ गावांमध्ये, खेडमध्ये ३५ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात ६५ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात ३, गुहागर तालुक्यात ८ आणि राजापूर तालुक्यात तीन गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणाची स्थिती
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ६७, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १५, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे २, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी -२, केकेव्ही, दापोली – १३ असे एकूण १०० संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या १९ हजार ८१५ इतकी आहे.
