स्नेहल पावरी ठरल्या बेस्ट एनसीसी ऑफिसर

रत्नागिरी : फर्स्ट ऑफिसर स्नेहल संतोष पावरी यांना कोल्हापूर ग्रुप एनसीसीच्या सन २०१९-२०च्या बेस्ट एनसीसी ऑफिसर पुरस्काराने ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग येथे सन्मानित करण्यात आले. त्या रत्नागिरीतील गोदूताई जांभेकर विद्यालयात सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

कोल्हापूर ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर आर. के. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार पावरी यांना प्रदान करण्यात आला. कमांडिंग ऑफिसर कर्नल नरेश कुमार आणि सुभेदार मेजर प्रकाश रॉय हेही या वेळी उपस्थित होते.

आतापर्यंत स्नेहल पावरी यांना एनसीसी अधिकारी म्हणून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सहा महाराष्ट्र बटालियन कोल्हापूर युनिटमधून कोल्हापूर ग्रुपमध्ये त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच सन २०१०-११मध्ये कोल्हापूर येथील कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार त्यांना देण्यात आला. २०१४-१५ व २०१८-१९च्या सर्वोत्कृष्ट एनसीसी अधिकारी (एएनओ) पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २६ जानेवारी २०१८ रोजी रत्नागिरीत प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमात उत्कृष्ट संचलन मार्गदर्शक पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले.

पावरी यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनीही त्यांना गौरविले आहे. त्यांच्या यशामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply