रत्नागिरी जिल्ह्यात ७० नवे रुग्ण; तीन मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. २२) ७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३३४५ झाली आहे.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ११, रायपाटण ३. ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी १५, राजापूर ३, कामथे २३, खाजगी लॅब १५.

आज बरे झाल्याने ९१ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय १५, देवरूख १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी १८, कामथे ६, कोव्हिड केअर सेंटर, घरडा ६, लांजा ३, महिला रुग्णालय ४२. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१०४ झाली आहे.

आज तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. ते तिघेही चिपळूणचे असून ते ४८, ४५ आणि ६२ वर्षे वयाचे आहेत. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील मृतांची संख्या २५, तर जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १२१ झाली आहे. तालुकानिहाय मृतांचा तपशील असा – रत्नागिरी ४०, खेड १२, गुहागर ४, दापोली २१, चिपळूण २५, संगमेश्वर ९, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.

सध्या विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार १२० आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकूण १०० जण असून, त्यातील ४३ जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply