सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका दिवसात १३० करोनाबाधित वाढले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ ऑगस्ट) एकदम १३० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ९३२वर पोहोचली आहे. एवढी मोठी वाढ एकाच दिवशी होण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ आहे.

जिल्ह्यात करोनाने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला असून, त्यापैकी एक जण गोव्यातील आहे. ४९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २४९ अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११ हजार २७५ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९३२ अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दोन मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन लाख ७०१ नागरिक आले आहेत. सध्या जिल्ह्यात १०४ कंटेन्मेंट झोन असून, एकूण १६ हजार ६९४ व्यक्ती अलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात ४१७३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत १४३३ जण कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply