साप्ताहिक कोकण मीडिया – २५ सप्टेंबरचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २५ सप्टेंबर २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/2qfcv77 येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

१८ सप्टेंबरच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : जबाबदारी कोणाची? https://kokanmedia.in/2020/09/25/skmeditorial25sep/

मुखपृष्ठकथा : पेपरवाल्यांनाही बसले करोनाचे घाव : करोना, लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटांनी पाठोपाठ सर्वांना तडाखे दिले. सर्वांना कसे फटके बसले, याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मात्र किती फटका बसला आहे, यावर फारसं लिहिलं गेलं नाही. या प्रश्नाचा आढावा घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…

मी केली करोनावर मात : कल्याण येथील ८० वर्षांचे ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर यांनी नुकतीच करोनावर मात केली. त्यांचा लेख…

क्वारंटाइन ते मृत्यू…. अनुभवलेला करोना : वडील करोनाबाधित झाले नाहीत तरी त्यांना क्वारंटाइन व्हावं लागणं, बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आजी-आजोबा आणि उपचार सुरू असताना आजोबांचा झालेला मृत्यू आणि आईबरोबरच स्वतःला करोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलेल्या वैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेला लेख…

मुलांची प्रतिकारशक्ती ऑनलाइन वाढणार आहे का : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply