फिनोलेक्स ॲकॅडमीच्या “स्टार्ट अप! एव्हरीथिंग यू नीड टू नो” परिसंवादाला प्रतिसाद

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमीचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले. स्टार्ट अप कौन्सिल ऑफ इंडियाचे ऑनररी एक्झिक्युटिव्ह चेअरमन राजीव वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार्ट – अप ! एव्हरीथिंग यू नीड टू नो या विषयावर ऑनलाइन पद्धतीने परिसंवाद झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात श्री. वैष्णव यांनी विद्यार्थी आणि पालकांना बोधपूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये उद्योगधंद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय निर्माण करण्याचे मार्ग प्रदान करणे हा परिसंवादाचा उद्देश होता. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे दर्जेदार शिक्षण मुंबई-पुण्यासारख्या महागड्या शहरात न जाता कमी खर्चात आपल्या घराजवळ मिळावे, कोकणातील मुले निधीअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने फिनोलेक्स ग्रुपचे संस्थापक कै. प्रल्हाद छाब्रिया यांनी रत्नागिरीत १९९६ साली फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलजी हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. तेथे विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून श्री. वैष्णव यांचा परिसंवाद झाला. राजीव वैष्णव हे जनरल बॉडी ऑफ गव्हर्निंग कौन्सिल ऑफ महाराष्ट्र स्टेट चे सदस्य आहेत. त्यांच्याकडे ४० वर्षांचा अनुभव आहे. नॅसकॉमच्या सिनियर मॅनेजमेंट टीमचे ते सदस्य आहेत. स्टार्ट अप आयडिया कशी असावी, आपली आयडिया प्रमोटर्स आणि फायनान्ससाठी कशी प्रस्तुत करावी, स्वयंप्रोत्साहन कसे असावे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द कशी टिकवावी या विषयांवर श्री. वैष्णव यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी उद्योग जगतामध्ये आपला स्वतःचा उद्योग कसा सुरू करायचा, याबद्दल त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या शंकाचे निरसनदेखील केले.

फिनोलेक्स ॲकॅडमीच्या प्रा. वृषाली निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यूट्यूब लाइव्ह माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply